अरविंद देवरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते अजित पवार आणि जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यावर नितांत प्रेम करणारे धरणगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते अरविंद देवरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

अरविंद देवरे यांच्या नियुक्तीचे पत्र माजी मंत्री आणि अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, ज्ञानेश्वर नाना महाजन, धरणगाव तालुकाध्यक्ष शाम भाऊ पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अरविंद देवरे हे धरणगाव तालुक्यात एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. अजित दादा पवार आणि संजय पवार यांच्या नेतृत्वावर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या नियुक्तीबद्दल बोलताना अरविंद देवरे यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “पक्ष आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. अजित दादा पवार आणि संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जळगाव जिल्ह्यात अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्णपणे समर्पित राहीन.” जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी अरविंद देवरे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “अरविंद देवरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या नियुक्तीमुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जळगाव जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे काम करेल.”

Protected Content