जून्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जून्या भांडणाच्या कारणावरुन  तिघांकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समता नगरातील शिव मंदिर परिसरात घडली. याबाबत तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, शहरातील समता नगरातील शिवमंदिर परिसरात संजय मधुकर पाटील (वय-४२) हे वास्तव्यास आहेत. जून्या भांडणाच्या कारणावरुन बुधवार १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भावड्या दुबल्या करोसिया, मनिष दुबल्या करोसिया व संजू दुबल्या करोसिया या तिघांनी संजय पाटील यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अजित पाटील हे करीत आहे.

Protected Content