पाडळसा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोघांकडून बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगन्नाथ चिंधू भोई (वय-२४) रा. पाडळसा ता. यावल हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी ३० मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तरूणी घरासमोर असलेला असतांना त्यांच्या गल्लीतील राहणारे कुमार सुनिल कोळी आणि सुनिल आत्माराम कोळी हे जगन्नाथ जवळ आले. आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करून हातातील लोखंडी मुसळीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जगन्नाथ भोई यांच्या कुटुंबियांना देखील शिवीगाळ करून जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. जगन्नाथ चिंधू भोई याच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  कुमार सुनिल कोळी आणि सुनिल आत्माराम कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.

Protected Content