रेल्वेतून अवैधरीत्या दारू घेऊन जाणाऱ्या तरुणास अटक

WhatsApp Image 2019 07 23 at 9.05.45 PM

जळगाव ,प्रतिनिधी | येथून चंद्रपूर येथे देशी दारूच्या बाटल्या जोधपुर चैन्नई एक्स्प्रेसने घेऊन जात असतांना रेल्वे पोलिसांनी  तरुणास अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

मोनू मदन भाट (वय २३ वर्ष रा.कंजर वाडा, जळगाव) हा जोधपुर चैन्नई एक्स्प्रेसने मधून ९० मिलीची छोटी दारूच्या ३९ हजार रुपये किमतीच्या १५०० बाटल्या घेऊन जात होता. या तरुणास आरपीएफ पथकाने प्लाट फार्म क्र.५ येथून ताब्यात घेतले. आरपीएफ पथकात उप निरीक्षक जी. एम. घिगे, प्र. आ. निलेश अढवाल, आ. रिहान अहमद, आ. प्रमोद सांगळे, आ. विक्रम वाघ, आ. निलेश गिरासे यांचा समवेश होता. गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांच्या ताब्यात मोनू यास देण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, मुकेश पाटील, सागर देशमुख, विठ्ठल हटकर यांच्या ताब्यात देण्यात आले.

Protected Content