जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्जबाजाराला कंटाळून ३७ वर्षीय तरूण शेतकऱ्याने राहत्या घरात सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद भागवत पाटील (वय-३७) रा. तरडी ता. धुळे ह.मु. आव्हाणे ता. जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे ता. जळगाव येथे वास्तव्याला होता. लहानपणीच आईवडीलांचे निधन झाल्याने आव्हाणे येथे मामाच्या गावाला रहायला आले होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीया निमित्त पत्नी आरती ह्या मुलगा मनिष सोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता. सोमवारी १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या पुर्वी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. कर्जबाजारीतून आत्महत्या केल्याचे माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे. त्याच्या पश्चात मोठा भाऊ गजानन, पत्नी आरती आणि मुलगा मनिष असा परिवार आहे.