ब्रेकिंग : भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चाळीसगाव- कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, “नामदेव गोबरू राठोड (वय- ६२) रा. मुंदखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.२० सीएल १६०४) आज वैयक्तिक कामानिमित्त चाळीसगावला आले होते. काम आटोपून घरी परतताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम.एच. १७ एझेड ९०१९) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात नामदेव गोबरू राठोड (वय- ६२) यांच्यासह एका विवाहितेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचाराकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांची प्राणज्योत मावळली.

चाळीसगाव- कन्नड रोडवरील सहयोग हॉटेलसमोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास हि घटना घडली.

दरम्यान घटना घडताच कार चालक पसार झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. यात मृत विवाहित महिलेची ओळख सायंकाळी पर्यंत पटलेली नव्हती. तत्पूर्वी राठोड यांची सासरवाडी तालुक्यातील लोणजे येथील आहे. यामुळे सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी ते आले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करणे सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!