पाचोरा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्य संघटनेची जळगांव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असुन या संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भुषण देवरे व कोअर कमिटीच्या संमतीने तसेच संघटनेचे उप संस्थापक नितीन देवरे यांचे आदेशान्वये करण्यात आली आहे. योगेश पाथरवट यांची हिंदवी स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.