चाळीसगाव ट्रामा केअरमधील ३९ कर्मचारी कपात !

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची तुटवडा जाणवू लागल्याने मानधन तत्वावर पदे भरण्यात आली होती. मात्र दुसरी लाट ओसरताच तालुक्यातील ३९ कोरोना योध्दांना घरचा रस्ता दाखविण्याचे वरतून आदेश आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

कोरोनाच्या काळात जनतेला आरोग्य सेवा पुरवावी यासाठी शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती केल्या होत्या. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरताच तालुक्यातील तब्बल ३९ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आज 2 जुलै रोजी सायंकाळी आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना मिळताच. चाळीसगाव तालुक्यातील तब्बल 39 कर्मचारी कमी कारण्याचे आदेश दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आमचा रोजगार गेल्याने आता यापुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीला त्रिदल सैनिक संघटना व जय जवान ग्रुप चाळीसगाव यांनी कर्मचारी यांना पाठिंबा दर्शविला आहे.

 

Protected Content