क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पोहचवली तात्काळ मदत

धरणगाव प्रतिनिधी । येथील कोविड केअर सेंटरमध्ये परवा सायंकाळपासून ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असले तरी येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने या सर्वांची प्रचंड गैरसोय असल्याच्या वृत्ताची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना करत तात्काळ वापरासाठी पाण्याचे टँकर, शुद्ध पाण्याचे जार , टाॅयलेटला कडी आदी वस्तू पाठवल्या. दरम्यान, दुसरीकडे मात्र, महसूल प्रशासन पूर्णपणे अंग झटकत असल्याचे चित्र आहे.

 

धरणगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्यांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते वृध्दांचा समावेश आहे. यातील एका वृध्दाचे बाय-पासचे ऑपरेशन करण्यात आले असून दुसर्‍याला हाय-बीपी व मधुमेहाचा त्रास आहे. काल रात्री अकरा वाजेपासून ते आज सकाळपर्यंत या सेंटरमध्ये पिण्याचे तसेच वापराचे पाणी संपले असल्याने हे सर्व जण त्रस्त झाले होते. आगदी आज सकाळी ते शौचास देखील जाऊ शकले नाहीत. तर पिण्याच्या पाण्यावाचून त्यांचा जीव कासाविस झालेले होता. येथील बाथरूम, टॉयलेट अस्वच्छ होते. या संदर्भात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एकाने ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ कडे व्यथा मांडली होती. त्यानुसार वृत्त प्रकाशित होताच जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि सर्व अत्यावश्यक वस्तू तात्काळ पोचविण्याच्या सूचना केल्या. मदत मिळाल्यानंतर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी श्री. वाघ यांचे आभार मानले. दरम्यान, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग अंग झटकत असल्याचे चित्र आहे.

Protected Content