कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे खासदारांना निवेदन

 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी ।  कोरोना 19  अंतर्गत कंत्राटी भरती असलेल्या डॉक्टर ,सिस्टर, वार्डबॉय यांना कामावरून कमी करण्यात आले आहे  यासंदर्भात कंत्राटी  डॉक्टर , वॉर्डबॉय  यांनी आज   मुक्ताईनगर  येथे  खासदार रक्षा खडसे यांना निवेदन दिले

 

covid-19 अंतर्गत कंत्राटी भरती मधील कर्मचारीवर्ग यांनी मुक्ताईनगर तालुक्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा दिली होती परंतु आता covid-19 संसर्ग कमी होताच प्रशासनाने कंत्राटी भरती असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले आहे या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या आशयाचे निवेदन आज मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील व रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांना देण्यात आले निवेदनावर  कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर ,वार्ड बॉय , सिस्टर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

 

Protected Content