बापरे : माथेफिरूने कापली २५ लाख रूपयांची केळीची खोडे !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शिवारातल्या एका शेतकर्‍याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किंमत असलेली केळीची खोडे माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी तसेच अन्य पिकांची नासधूस करण्याच्या विकृत घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा असाच प्रकार यावल शिवारात घडला आहे. अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या मालकीचे यावल शिवारातील शेत गट नंबर ९०७ मध्ये एक हेक्टर ८६ आर या क्षेत्रामध्ये केळीची लागवड करण्यात आलेली आहे. काल सकाळी राजेंद्र चौधरी यांच्यासह त्यांचे पुत्र हे काल सकाळी शेतात गेले होते. यानंतर आज सकाळी भूषण चौधरी हा शेतामध्ये गेला असता त्याला शेतातील केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले.

राजेंद्र चौधरी यांच्या शेतामधील ७००० केळीच्या खोडांची व गडांची कापून अज्ञात माथेफिरूंनी फेकल्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल पोलीस पोलीस गाठले आणि अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५९ भादवी कलम ४४७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला यात पंचवीस लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर ही माहिती मिळताच फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी राजेंद्र चौधरी यांच्या शेताला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण देखील केल्याचे वृत्त आहे.

Protected Content