यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू माफिया इतके मुजोर झाले आहेत की, आज तालुक्यातील अंजाळे येथील कोतवालास आठ ते दहा जणांच्या माफियांनी बेदम मारहाण केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अंजाळे गावातील कोतवाल ओंकार लिलाधर सपकाळे यांनी अवैध वाळची तस्करी करणाऱ्या काहींविरोधात तक्रार दिली. याचाच राग आणून नऊ ते दहा वाळू माफियांनी आज रोजी सपकाळे हे तलाठी कार्यालयात आपले शासकीय काम करीत होते. तेव्हा वाळू माफियांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून सपकाळेला तक्रार का दिल्याचे जाब विचारला. व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहीती पोतीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे. दरम्यान सदर वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोतवाल संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर प्रशांत सरोदे, व्ही. एस. राठोड, विजय माळी, निलेश गायकवाड, एस सोळंके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.