भुसावळात किरकोळ कारणावरून हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा

Crime 1

भुसावळ प्रतिनिधी । हॉटेल हेवन समोर दोन जणांना मध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नगरसेवक किरण भागवत कोलते वय-39 रा. हॉटेल हेवन समोर भुसावळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करून दुचाकीने घरी परतत असतांना हॉटेल हेवन जवळील रोडवर असलेल्या उजव्या बाजुला संजय चौधरी हे त्यांच्या टपरीजवळ काम करत असंताना काय करत आहे असे विचारणा केली असतांना संजय चौधरी यांनी शिविगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याचा मुलगाल मुन्ना उर्फ प्रशांत चौधरी यांने देखील बाजुलापडलेला फावड्याने मारहाण केली. यात सोबत असलेल्या मॅनेजर सुरेश नापडे हे देखील जखमी झाले. तसेच मुन्ना यांनी खिश्यातील 5 हजार 700 रूपये रोख बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी संजय लोटन चौधरी आणि त्याचा मुलगा मुन्ना संजय चौधरी यांच्याविरोधात भुसावळ बाजार पेठ ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फियार्दी संजय लोटन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 23 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास दुकान दुरूस्तीचे काम करत असतांना नगरसेवक किरण कोलते यांनी मला विचारल्याशिवाय कोणत्याची दुकानाचे काम करता येणार नाही. असे बोलून शिवीगाळ केली त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की केली. त्यानंतर कोलते यांनी फोनवरून कल्पेश ढाके, किशोर कोलते, किशोर पाटील, मयुर कोलते, दिपक पैलवाना यांना बोलावून घेतले. त्यांनी तिन फावड्याचे दांडे काढून मारहाण करून जखमी केले. तर काहींनी दगड मारून दोन दुचाकींचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजापेठ पोलीसात नगरसेवक किरण कोलते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रमण सुरळकर करीत आहे.

Protected Content