आशाबाबा नगरातून तरूणी बेपत्ता; रामानंदनगर पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरातून १८ वर्षीय तरूणी ७ डिसेंबर रोजी सकाळी काहीही न सांगता बेपत्ता झाली असून वडीलांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, विजयसिंग बाबुलाल पाटील (वय-४६) रा. आशाबाबा नगर हे खासगी व्यवसाय करतात. घरी पत्नी आणि मुलगा आणि मुलगी धनश्री सोबत राहतात. ७ डिसेंबर रोजी धनश्री विजयसिंग पाटील (वय-१८) ही आईला कॉलेजला जाते असे सांगून घरातून सकाळी १० वाजेच्या सुमारास गेली. रात्री उशीरापर्यंत घरी न अल्याने आई-वडीलांनी मैत्रिण आणि नातेवाईकांकडे संपर्क साधला असता काहीही पत्ता लागला नाही. वडील विजयसिं पाटील यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

शरीराने सडपातळे, उंची ५ फुट ४ इंट, रंगाने गोरी, चेहरा गोल, पंजाबी ड्रेस, लाल रंगाचा कुर्ता व सलवार, उजव्या गलावर बारीक तीळ असून कोणाला आढळून आल्यास रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.

Protected Content