यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज जप्त करत दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३० जुन रोजी सायंकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ते यावल रस्त्यावरील खंडेराव मंदीरा जवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला.
या छाप्यात जगदीश रतन धनगर, (राहणार सांगवी बुद्रुक ), मिलींद संतोष कोळी (डोंगर कठोरा), तुषार वसंत फेगडे (रा . अट्रावल), प्रदीप रवीन्द्र भालेराव (कोळवद), गोविंदा सुरेश कोळी, (अट्रावल), नितिन पंढरीनाथ चौधरी (अट्रावल), अन्वर फकीरा तडवी, (डोंगर कठोरा), सुशाल अशोक कोळी ( डोंगर कठोरा), दिलीप कृष्णा तेली (सांगवी बु), चंदन भिमराव अढाईगे (कोळवद) या दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जण झन्नामन्नाचा जुगार खेळतांना पत्ता जुगार साहित्य साधनासह तिन मोटरसायकली सह एकूण एक लाख तिन हजार५५ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनचे अमलदार सुशिल रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये मुबंई जुगार अॅक्ट प्रमाणे १२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पोलीस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान हे आपले सहकारी पोलीस कर्मचार्यांच्या सोबत करीत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशाने चार दिवसापुर्वीच यावल शहरातील एका जुगारीच्या अड्डयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर यावल पोलीसांनी जुगारीच्यावरील दुसरी कार्यवाही केली असुन याचे वागत करण्यात येत आहे. तालुक्यातील दुसर्या जुगार अड्डयांवर देखील कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.