कोविशिल्डच्या तिसर्‍या डोसची आवश्यकता नाही : नवीन संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली । कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या तिसर्‍या डोसची आवश्यकता नसल्याचे नवीन संशोधनातून दिसून आले आहे.

सध्या डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. यातच या व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी कोविशिल्ड लसीचा तिसरा डोस आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमिवर नवीन संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष हे अत्यंत दिलासादायक आहेत.

कोव्हिशिल्ड बनविणाऱी कंपनी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तिसऱ्या डोसची गरज आहे की नाही यावर संशोधन केले आहे. यामध्ये असे आढळले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील. यामुळे कदाचित तिसऱ्या डोसची गरजही लागणार नाही, अशी अपेक्षा या संशोधकांना व्यक्त केली आहे. या अभ्यासानुसार एस्ट्राजेनेका व फायजर कंपनीच्या लसींचे दोन्ही डोस घेतल्यास डेल्टा व्हेरिअंटमुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्य़ाची शक्यता जवळपास ९६ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

आणखी एका संशोधनात एस्ट्राजेनेकाच्या लसीचा एक डोस घेतल्यानंतर शरीरात कमीतकमी एक वर्षापर्यंत अँटीबॉडी टिकतात असे दिसून आले आहे. दुसऱ्या डोसनंतर सुरक्षा आणखी वाढते. कोव्हिशिल्डचा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळत आहे. यामुळे शरिरातील अँटीबॉडीचा स्तर वाढणार आहे.

Protected Content