लोकलवरून राजकारण नको — गृहमंत्री देशमुखांनी सुनावले

मुंबई : वृत्तसंस्था । लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतंही राजकारण करू नये असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खडसावलं आहे. अनिल देशमुखांनी राज्य सरकारकडून प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सुचवलं असल्याचंही सांगितलं. .

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून बंद असलेली लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसंच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी दर्शवली असून विनंती करणारं पत्र रेल्वेला पाठवलं आहे. राज्य सरकारने प्रवासासाठी वेळापत्रक तयार केलं असून तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आलं आहे.

यानंतर रेल्वेकडून मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये असमर्थता दर्शवण्यात आली असून अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे. “जर रेल्वेने सहकार्य केलं तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यामुळेच कोणतंही राजकारण न करता रेल्वेने सहकार्य करावं,” असं ते म्हणाले आहेत.

Protected Content