मोदीच पंतप्रधान होतील का, हे सांगता येणार नाही : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी मोदी विराजमान होतील की नाही, हे सांगता येणार नाही अशी शंका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. ते औरंगाबादेतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

नारायण राणे पुढे म्हणाले की, देशात भाजपाचेच सरकार येईल, भाजपला 200 जागा मिळतील. पण, पंतप्रधान कोण होईल हे सांगता येत नाही. तरीही, मोदी पंतप्रधान व्हावेत ही अपेक्षा असल्याचे नारायण राणेंनी म्हटले. राणेंनी शिवसेनेलाही टार्गेट केले. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान 5 जागा तरी लढवणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेसाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केला. पत्रपरिषदेत नितेश राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारीची घोषणा करून लगेच नारायण राणे हे रात्री विमानाने मुंबईकडे रवानाही झाले. याच वेळी स्वाभिमान पक्षाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून माजी महापौर सुदाम सोनवणे यांची नियुक्ती राणे यांनी जाहीर केली.

Add Comment

Protected Content