रावेर येथे रेल्वे खाली झोकून प्रौढाची आत्महत्त्या


WhatsApp Image 2019 03 09 at 2.35.45 PM

रावेर (प्रतिनिधी) येथील बऱ्‍हाणपूर रोडवरील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील रहिवासी रवींद्र रमेशचंद्र अग्रवाल (गाथोडिया) (वय-४९) यांनी शुकवारी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास रेल्वे मालधक्क्याजवळ आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. शहरातील नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांचे ते शालक होते. शुक्रवारी सकाळी येथील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर त्यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली. याबाबत उपस्टेशन अधीक्षक किशोर सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास शिवलाल दहीकर व विकास चाटकर करत आहेत. रवींद्र अग्रवाल हे गेल्या अनेक वर्षापासून शहरात त्यांचे मेहुणे प्रकाश अग्रवाल याचे कामकाज सांभाळत होते


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here