गोराडखेडा येथील बालकाचा कंटेनरखाली चिरडून दुदैवी मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील गोराडखेडा येथील दहा वर्षाच्या चिमुकल्याचा खेळतांना कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीसात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, गोराडखेडा ता. पाचोरा येथील मूळ रहिवासी (ह. मु. रामानंदनगर पाचोरा) किशोर रघुनाथ चौधरी (व्यवसाय चौधरी ट्रान्सपोर्ट) यांच्या दहा वर्षीय मुलगा नामे पुष्कराज किशोर चौधरी याचा १८ रोजी सायंकाळी ७:३० वाच्या सुमारास प्रेम नगर भागातील पूजा ट्रान्सपोर्टचे मालक मनोज सुदाम सूर्यवंशी यांच्या घराजवळ खेळत असताना कंटेनरच्या मागच्या चाकाखाली असल्याने चिरडून दुदैवी अंत झाला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन त्यांनी कंटेनर ताब्यात घेतले. मुलाला उपचारार्थ विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात बलकाचे शवविच्छेदन करून त्याच्यावर रात्री ११:३० च्या सुमारास समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आला.  सदर घटनेची वडील किशोर रघुनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला असून कंटेनर क्रमांक (एमएच ०६ बीडी १८७८) क्रमांकाच्या गाडी चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहेत.

Protected Content