तीन ग्रामसेवकांना ग्रामस्तरीय मतदार नोंदणीसाठी पुरस्कार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना उत्कृष्ट ग्रामस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले तिन ग्रामसेवकांना आज महसुल प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदा उत्कृष्ट ग्रामस्थरीय मतदार नोंदणी अधिकारी (बिएलओ )म्हणुन प्रशिस्तीपत्र गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधुन निवडणुक आयोगाच्या वतीने राबविण्यात मतदार नोंदणी अभीयानात मालोद , मोहराळे व बोराळे या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले राजु अन्वर तडवी; चितोडा आणी चिखली येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या रूपाली तळेले आणी बोरखेडा येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले लक्ष्मीकांत उर्फ हितू महाजन यांना यंदाचे उत्कृष्ट बिएलओ म्हणुन गौरविण्यात आले.

फैजपुर येथील प्रांत कार्यालयातील सभागृहात विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते आणी यावलचे तहसीलदार महेश पवार, यावल येथील निवडणुक शाखेतील नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.

Protected Content