हिंगोणा उर्दू शाळेची तंबाकूमुक्त शाळा म्हणून निवड

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची यलो लाईट कँपेनच्या अंतर्गत तंबाकूमुक्त शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येलो लाईन कॅम्पेन अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू शाळा हिंगोणाची तंबाखूमुक्त शाळा म्हणून निवड करण्यात आली. ही निवड यावल तालुका आरोग्यधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे, डॉ. कीर्ती भामरे, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांनी केली.

या कार्यक्रमासाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिति सदस्य व तंबाखू मुक्त शाळा अभियान प्रमुख राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या मार्गदर्शन खाली तसेच राज मोहम्मद खान शिकलगर यांनी शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्था द्वारे चालविले जाणारे तंबाखू मुक्त शाळा अभियान विषयी यावेळी सविस्तर माहिती दिली.

या वेळी शाळेचे मुख्यध्यापक अहमद जनाब, शाळेतील शालेय समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख, उपाध्यक्ष शब्बीर खान व अली मोहम्मद जनाब मुक्तार, हाजी युसुफ, सल्लाउद्दीन जनाब, आसीफ जनाब यांच्यासह शिक्षण समितीचे इतर पदधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळीस जळगाव जिल्ह्यातुन यावल तालुक्यातील हिंगोणा या गावातील आपल्या शाळेची निवड तंबाखु मुक्त शाळा म्हणुन निवड झाल्याबद्दल शालेय समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Protected Content