यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघच्या चेअरमनपदी सुनिल फिरके

यावल प्रतिनिधी । येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमनपदी सुनिल फिरके तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल नेवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सहाय्यक दुय्यम निबंधक जे.बी.बारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.६ ऑक्टोबर) रोजी बैठक संपन्न होवुन ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. 

या बैठकीस संचालक नरेंद्र नारखेडे, संचालक यशवंत तळेले, प्रभाकर सोनवणे, गणेश नहते, नितिन चौधरी, प्रशांत चौधरी, नितिन नेमाडे, अमोल भिरूड, सुनिल फिरके, सुनिल नेवे, संचालीका भारती चौधरी, नीलीमा फिरके, मसाकाचे शरद महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राकेश फेगडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्यासह आदी मान्यवर मंडळी बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. निवडणुक प्रक्रियेसाठी पार पडलेल्या या बैठकीची प्रस्तावना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक एस.के. गाजरे यांनी मांडली तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संघाचे संचालक अमोल भिरूड यांनी मानले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.