श्रीक्षेत्र मनुदेवीच्या चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या श्रीक्षेत्र मनुदेवीच्या चैत्र नवरात्रोत्सवात आजपासून प्रारंभ होत असून दोन वर्षानंतर पहिल्यांदाच यात्रोत्सव होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीला घटस्थापना करून पौर्णिमेपर्यंत मंदिरावर यात्रा भरते. आज माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन. डी. चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. संस्थानचे व्यवस्थापक आर. के. पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील व दगडू महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.

यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. यात्रेत नवस फेडणे, जाऊळ आणि शेंडीचा मान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनुदेवीचा चैत्र यात्रोत्सव भरणार असल्याने भाविकांमध्ये अतिशय चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

Protected Content