शासन आपल्या सोबत – पालकमंत्री

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळात शासन आपल्या सोबत असून आपण नव्याने आयुष्यात उभारी घ्यावी, अशा भावना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. ते शहरातील धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील १९महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ३लाख ८० हजाराचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. तहसील कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ३ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील १९ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ३ लाख ८० हजाराचे मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच प्रत्येक लाभार्थी महिलेला रुपये १०,०००चा एका महिन्याच्या किराणा व जीवनावश्यक वस्तूं वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कंखरे आभार नायब तहसीलदार सातपुते यांनी मानले. प्रास्ताविकात तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी योजनेची माहिती विशद केली.

या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तहसीलदार नितीन कुमार देवरे माजी सभापती प्रेमराज पाटील, उपनगराध्यक्ष विलास महाजन विलास पवार आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील १९लाभार्थ्यांना लाभ

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शोभबाई बुधा सोनवणे, बाभोरी, प्रमिला कोमल पाटील हिंगोने, कल्पना दगा पाटील हिंगोने, सोनाली धनराज पाटील धरणगाव , मनिषा संजय महाले धरणगाव, इंदूबाई शांताराम गजरे बाभळे, वंदना बाई कैलास पाटील साकरे सुरेखा रातीलला पाटील सोनवद आशा बाई मधुकर भिल फुलपाट सपना नितीन महाजन पाळधी संगीता कडू धनगर पाळधी अरुणा अशोक कोळी चांदसर जुबेदा राजू पिजारी पिपळे सिम कविता समाधान सोनवणे पथराड दगुबाई रवींद्र पाटील पष्टाने आशा अरुण मोरे मुसळी दिपाली रवींद्र महाजन वंजारी गुंता बाई दामू लोंढे, प्रीप्री मंगला अनिल पाटील बोरखेडा आशा १९लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सगयोचे घुले, चौधरी , गणेश पवार पंकज शिंदे, मनीषा शिरसाळे, साखेद शेख यांनी मेहनत घेतली.

Protected Content