यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आश्रमशाळेतील विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रीय अनुसुचीत जनजाती आयोगाने दिलेल्या नोटिशीनंतर याबाबतचा अहवाल आज सादर होण्याची शक्यता आहे.
यावल येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणार्या देवझीरी तालुका चोपडा येथील शासकीय आदीवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणार्या एका विद्यार्थीनीचा दारूच्या धुंदीत अश्लीलचाळे करीत विनयभंग करणार्या त्या अधिक्षकावर अद्याप पर्यंत कार्यवाही न झाल्याने राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने या संदर्भात जळगावचे जिल्हा अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना कार्यवाही करणे संदर्भात नोटीस बजावली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाने नोटीसीव्दारे म्हटले आहे की , या देवझीरीच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणार्या आदीवासी विद्यार्थीच्या विनयभंग प्रकरणी तिन दिवसाच्या आत सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी असलेल्या संबधीत अधिक्षकावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करता येते का याबाबत अहवाल पाठवावा, असे आशयाची नोटीस पाठविण्यात आली आहे.
देवझीरी तालुका चोपडा येथील आदीवासी आश्रमशाळेतील अधिक्षक सचिन गाढे याने दारू पिवुन आश्रम शाळेतील एका तरूणीचा विनयभंग केला असुन, या सर्व प्रकरणास दडपण्यासाठी शाळा प्रशासन व यावल येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने या अतिशय गंभीर अशा प्रकरणाची दखल न घेता अद्यापपर्यंत कुठल्याची प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
यासंदर्भात आदीवासी प्रकल्प स्तरिय समितीचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉ चंद्रकांत बारेला यांनी आवाज उठवत तहसीलदार व अनुसुचित जनजाती आयोगाकडे तात्काळ ईमेल व्दारे तक्रार पाठवित या आदीवासी विद्यार्थीच्या आयुष्याशी निगडीत विषयात तात्काळ दखल घेण्याची मागणी केली होती. या गंभीर अशा प्रकरणाच्या तक्रारी अनुसुचित जनजाती आयोगाने तात्काळ दखल घेत, तिन दिवसाच्या आत या आदीवासी विद्यार्थीच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करीत शाळेतील अधिक्षक सचिन गाढे याच्यावर ऍट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का असा चौकशी अहवाल तिन दिवसाच्या आत आयोगाकडे पाठवावा अशी नोटीस जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना देण्यात आली आहे.
या संदर्भात आदीवासी विकास प्रकल्प विभागाकडून या आदीवासी विद्यार्थीच्या आत्मसम्मानाशी निगडित विषयाला दडपण्यासाठी वेग वेगळी कलाटणी देत गोंधळ निर्माण करण्यात येत असुन , या सर्व प्रकाराची देखील चौकशी करून जे कोणी यात विनयभंग करून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणार्या दारूड्या व्याभिचारी वृत्तीच्या अधिक्षकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा अधिकार्यांवर देखील शिस्त भंगाची कार्ववाही का करण्यात येवु नये असा प्रश्न देखील डॉ .चंदकांत बारेला यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला आहे.
दरम्यान, आयोगाच्या नोटीशीनुसार आज या प्रकरणी अहवाल सादर होण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.