‘जलतरण’ या खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत ‘जलतरण’ या खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीकरीता नव्याने खेळाडू भरती करण्यासाठी वयोगट ८ ते १६ वर्षातील खेळाडूंच्या राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन दि. १२ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे करण्यात आलेले आहे. सदर चाचण्याकरिता खेळाडूंची जन्मतारीख दि. १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत असावी.

या निवड चाचणीकरिता मानके खालीलप्रमाणे –

अ) खेळाडू जलतरण या खेळामध्ये किमान राज्यस्तरावर सहभागी असणे आवश्यक आहे. (कौशल्य चाचणी)

ब) खेळाडू जलतरण या खेळामध्ये राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त असावा.

निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे निकष –

१)खेळाडुची उंची २) शरिरीक क्षमता ३) कौशल्य चाचणी ४) खेळातील कामगिरी ५) जलतरण चाचण्या – ५० मी फ्री १०० मी. मेनस्ट्रोक, ४०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षा आतील), ८०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षाआतील) ६) ८०० मी. धावणे, शोल्डर लेन्थ असे असेल.

या चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या फक्त खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात येणार असून  प्रवास व भोजन खर्च स्वतः करावयाचा आहे. तरी या चाचण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी जातांना जन्म दाखला व जलतरण क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे) सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) – ८६२५९ ४६७०९ यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content