यावल, प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील युवती सभाच्या अंतर्गत आज दि. २८ मे रोजी घेण्यात आलेल्या मासिक धर्म आरोग्य व्यवस्थापन दिनाचे औचित्य साधून झूम ॲपवर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. भुसावळ येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना खानापूरकर या प्रमुख मार्गदर्शक होत्या .याप्रसंगी व्याख्यानाच्या अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .संध्या सोनवणे उपस्थित होत्या.
डॉ .अर्चना खानापूरकर यांनी “मासिक धर्म काळात घ्यावयाची काळजी’ या विषयावर माहिती देताना सांगितले की, महिलांमध्ये मासिक धर्माविषयी अंधश्रद्धेच्या माध्यमातुन होणारे अनेक गैरसमज आहे. ते शास्त्रीय माहिती घेऊन प्रथम दूर करणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतीचे पॅड वापरणे, चौरस आहार व व्यायाम यावर भर दिल्यास आरोग्याची समस्या दूर होईल . अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी सांगितले की, मासिक धर्म आरोग्य व्यवस्थापन दिनाचे आयोजन म्हणजे एक प्रकारे महिलांमध्ये जागृती करणे. मासिक धर्म ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो आजार नाही तर वरदान आहे. आनंदाने त्याचा स्वीकार करा.याप्रसंगी युवतींनी प्रश्न विचारून शंकानिरसन केले. सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी तर आभार कोमल बोरणारे हिने मानले. सदर कार्यक्रमास अनेक युवती व यावल शहरातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा ए. पी. पाटील,प्रा. एम .डी .खैरनार ,प्रा. संजय पाटील, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी .व्ही. पावरा यांनी सहकार्य केले.