बीएचआर घोटाळा : सूरज झंवरला जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी | बीएचआर घाेटाळ्यात संशयित सूरज सुनील झंवर यांचा जामीन शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर मंजूर केला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. डब्ल्यू सामरे यांच्या खंडपीठासमोर झंवरच्या जामिनावर कामकाज झाले. संशयित सूरज सुनील झंवर यांचा जामीन शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर मंजूर केला. जामीन मंजूर करताना महाराष्ट्राबाहेर राहण्याची त्याला अट घालण्यात आली आहे. तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला सहकार्य करण्याचीही अट घालण्यात आली आहे.

यापूर्वी विशेष न्यायालयाने सूरजचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. युक्तिवादाच्या तारखांना न्यायालयाने सूरज हा त्याचे वडील सुनील झंवर याच्या व्यवहारात सहभागी असल्याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते.

Protected Content