भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीसात दाखल गुन्ह्यात फरार असलेली महिलेला आज सकाळी अंजाळा शिवारातून अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भाग-५, गुरनं ७०/२०२१ अन्वये अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अन्वये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला निर्मलाबाई उर्फ भुरी मॉ प्रशांत जाधव (वय-५४) रा. इंद्रानगर जामनेर रोड भुसावळ ही फरार होती.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, महीला पो.कॉ प्रिया आरखराव, महीला होमगार्ड विद्या लोखंडे या पथकाने यावल तालुक्यातील अंजाळा शिवारातील जागृत हनूमान मंदीरजवळ सापळा रचून अटक केली आहे. पोलीस तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व पोलीस नाईक किशोर महाजन करीत आहे.