जळगावात गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह युवकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानक परिसरात गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या युवकाला पोलीस पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक अरूण निकम यांनी गोपनीय शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते. दरम्यान, गोपनीय पथकाला माहिती मिळाली की, एक तरूण गावठी कट्टा बाळगून आहे. या अनुषगंनाने शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील पार्कींगच्या मागून करण प्रकाश पवार (वय२२ वर्षे, रा. गेंदालाल मील, मनपा क्वॉर्टर, जळगाव) या तरूणाला ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसे आढळून आली. संबंधीत तरूणावर आधी खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून आतादेखील तो काही तरी गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असतांनाच त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, व सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरूण निकम, विजय निकुंभ, बशीर गुलाब तडवी, अक्रम याकूब शेख, गणेश शिरसाळे, भास्कर ठाकरे, सुधीर साळवे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, तेजस मराठे व योगेश इंधाटे यांच्या पथकाने केली. संबंधीत तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content