Home क्राईम मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण; समता नगरातील घटना

मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण; समता नगरातील घटना

0
39


जळगाव प्रतिनिधी । नाले साफसफाईची पाहणी करतांना चार ते पाच जणांना अंगावर धावून येत दोघांना मारहाण करून दुखापत केली. ही घटना आज सकाळी समता नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहीती अशी की, शहरातील समता नगर परिसरात नाले सफाईची पाहणी करण्यासाठी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान महापालिकेचे उपायुक्त पवन पाटील, आरोग्य निरीक्षक बडगुजर, एस.आय. कुणाल बारसे आणि मुकादम उज्ज्वल पेंडवाल आले. पाहणी करत असतांना अचानक अज्ञात पाच ते सहा जण त्यांच्या अंगावर धावून आले. याती कुणाल बारसे आणि मुकादम पेंडवाल यांना मारहाण केली. मारहाण करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound