यावल, अय्यूब पटेल | शहरातील फालकनगर या विस्तारीत भागात भव्य बाल उद्यान आणि ओपन जीम सुरू करण्यात आली आहे. यात बालकांना खेळण्यासह तरूणांना व्यायामाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते अतुल पाटील यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे.
येथील शहरातील विस्तारीत क्षेत्रातील वसाहती मधील फालकनगरच्या श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात सुन्दर व भव्य असा बागीच्याचे कार्य हे पुर्णत्वास आले असुन, या उद्यानाचे काम पुर्ण झाल्या मुळे या क्षेत्राच्या नागरीकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी उद्यानाच्या कामास भेट दिली व उद्यानाच्या कामाबाबतची सविस्तर माहीती दिली. ते म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासुन शहराच्या विस्तारीत वसाहतीमध्ये फालक नगर क्षेत्रातील श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात लहान चिमुकल्या बालकांसाठी यावल नगर परिषदच्या माध्यमातुन ४५ लाख रुपयांच्या वेशिष्टपुर्ण निधीतुन फालक नगर वस्तीच्या सुन्दरते अधिकभर टाकणार्या आकर्षक अशा उद्यानाचे कार्य हे पुर्णत्वाकडे आले आहे.
या उद्यानात विविध प्रकारची लहान चिमकुल्या बाळांसाठी अत्याधुनिक खेळणे, सहज खेळतांना व्यायाम करता येईल अशी उपकरणे या उद्यानात लावण्यात आली आहेत. या परिसरातील नागरीकांनी मागील काही दिवसापुर्वी या ठिकाणी उद्यान निर्माण व्हावे अशी मागणी नागरीकांनी केली होती या मागणीचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याने नागरीकांनी पाटील यांचे आभार मानले. तर अतुल पाटील यांनी या उद्यानाची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
खालील व्हिडीओत पहा या बाल उद्यानाबाबतचा वृत्तांत.
युट्युब व्हिडीओ लिंक
फेसबुक व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/508992935887325/videos/520824439208972