जळगाव शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची साफसफाई करा; शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीचे गाळसह शेवाळ्याकाढून साफसफाई करावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा शिवसेनातर्फे महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील गेल्या काही महिन्यापासून पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची नागरीकांच्या तक्रारी होत आहे. फिल्टर प्लॅन्ट मधून येणारे पाणी पुरवठा व संबधीत प्रभाकामध्ये पाण्याच्या टाक्यामधून येतो व त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या टाक्यामध्ये जाते. तसेच शिवाजी नगर, खोटे नगर, पिंप्राळा, महाबळ, कालींका माता, एम.आय.डी.सी. या टाक्यामध्ये पाणीपुरवठा होत असतो. दोन/तीन वर्षांपासून ह्या टाक्याची साफसफाई एकदाही करण्यात आलेली नाही. यामुळे जळगावकरांना पिवळे व दुर्गधीयुक्त पाण्याला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने व सत्ताधारी महापौर व नगरसेवकांनी या गोष्टीची गांभीर्य कधी घेतली नाही. म्हणून आज जळगाव शहरातील ५ लाख लोकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात येवू शकते. तसेच महापौर, पाणीपुरवठा महानगरपालिकेचे आरोग्य सभापती यांनी कधी या टाक्याजवळ येवून पाहणी केलेली नाही. तसेच महानगर पालिकेने पाणीपुरवठाचे कर्मचारी टाक्या पुर्णपणे जिर्णावस्थेत असल्यामुळे त्या टाक्याचे जिने जिर्ण झालेले आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी साफसफाई करता येत नाही. तरी पाणी पुरवठा होत असलेल्या टाक्यांची साफसफाई लवकरात लवकर करून जळगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे गजानन मालपुरे, मंगला बारी, विजय बांदल, विश्वास महांगडे, दिनेश पधरीया, नितीन जावळे, विजय राठोड, निशांत काटकर, जितेंद्र गवळी, जितेंद्र बारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/296758688193029/

Protected Content