यावल तालुक्यातील समस्या व शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना

yawal baithak

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील विविध समस्था व शासकीय योजनांची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी आज तहसीलमध्ये मासीकमध्ये सर्व मंडळधिकारी आणी तलाठी यांना महसुल प्रशासनाच्या कडक सुचना निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी दिल्या आहेत.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की. आज दिनांक 21 मे रोजी सकाळी ११ वाजता द्यावल तहसीलदार यांच्या दालनात यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळधिकारी व तलाठी यांना खरीप दुष्काळचे २१ कोटी ४० लाख अनुदान वाटपाबाबत आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री किसान स्वाभिमान योजना आणी बोडअळीचे अनुदान वाटप संदर्भात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. राज्य शासनाकडुन मिळालेल्या अनुदानास वितरीत करण्यात आले असुन काही तांत्रीक अडचणी मुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम त्यांच्या खान्यात जमा झालेली नसेल अशा शेतकऱ्यांची यादी तात्काळ दुरुस्त करावी जेणे करून त्यांच्या खात्यात शासकीय अनुदानाची रक्कम वर्ग करता येईल अशी सुचना निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी सर्व मंडळधिकारी व तलाठी यांना दिल्यात.

गौणखनिजाबाबत सुचना
यावल तालुक्यात अनधिकृत गौणखनिज वाहतुकीने पुनश्च आपले डोके वर काढले असुन, तालुक्यात विविध ठीकाणी गावागावात मोठया प्रमाणात गौण खनिज ची चोरटी वाहतुक करण्यात येत असल्याने सर्व तलाठी व मंडळधिकारी यांनी आपआपल्या क्षेत्रात रात्रीची गस्त वाढवुन या चोरट्या मार्गाने सर्रासपणे होणाऱ्या अनधिकृत गौण खनिज वाहतुकीस योग्य ती कडक कार्यवाही करून प्रतिबंध घालावे, अशा सुचना व आदेश या वेळ सर्व तलाठी मंडळधिकारी यांना देण्यात आल्या आहे.

Add Comment

Protected Content