ब्रेकींग : अंजाळे घाटाजवळ पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ एका दुचाकीस्वाराला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या मोटारसायकलीसह लुटल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली आहे.

यावल-भुसावळ रस्त्यावर भुसावळ कडून येथील अजय रमाकांत मोरे हे त्यांच्या शाईन कंपनीच्या मोटरसायकल येत असताना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचे कडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले आहेत.

सदरची घटना रात्री पावणेदहा वाजे ची सुमारास घडली आहे. याचे वृत्त येथील पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंजाळा घाटात आता मोठा पूल झाला असल्याने हा भाग आधीपेक्षा सुरक्षीत झालेला असतांना आज याच परिसरात दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, चोरटे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते . यावेळी आरडाओरड होत असल्याचे पाहुन काही नागरीक धावुन येत असल्याचे पाहुन चोरटे घटनास्थळावरून पसार झाले . अंजाळे घाटावर गेल्या अनेक वर्षापासुन पोलीस चौकी बांधण्यात आली असुन ही पोलीस चौकी निव्वळ शोभेची वस्तु झाली आहे. येथे पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे.

Protected Content