यावल येथे प्रधानमंत्री किसान योजनेचे कार्य अपुर्णच

dr. ajit godabole

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील तहसील कार्यालयात आज (दि.4 जुलै) रोजी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान योजने बाबत बैठक घेण्यात आली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कार्य वारंवार बैठकीत सुचना देवुन देखील पुर्ण होत नसल्याने प्रांताधिकारी थोरबोले यांनी पुनश्च बैठक घेवुन तातडीने उर्वरीत काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधितांना दिल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 40 टक्के लाभार्थ्यांपर्यंत अद्याप लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने महसुल व पंचायत समिती तसेच कृषी विभागाच्या कारभाराव्दारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दिरंगाई बद्दलच्या कारणांची माहीती घेण्यासंदर्भात तातडीची आढावा बैठक घेवुन त्वरीत या योजनेच्या कामाला अंतिमरुप देण्याच्या सक्तसुचना प्रांताधिकारी थोरबोले यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, व ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत तहसीलदार जितेन्द्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार श्रार.के.पवार, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्यासह महसुलचे कर्मचारी मंडळ अधिकारी हे प्रामुख्याने या आढावा बैठकीस उपस्थितीत होते.

Protected Content