काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची मुले परदेशात स्थायिक

images 1

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवणाऱ्या ११२ फुटीरतावाद्यांच्या २१० मुलांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले असून ते तिकडेच स्थायिक झाल्याचे उघडकीस आले आहे. इतरांच्या मुलांना भडकावणाऱ्या या फुटीरतावादी नेत्यांची संसदेत पोलखोल करण्यात आली आहे.

 

केंद्रीय गृहमंत्रालयाने एक यादी जाहीर केली असून त्यात ११२ फुटीरतावाद्यांची मुले परदेशात काय करतात ? याचा लेखाजोखाच मांडला आहे. काश्मिरात तरुणांना भडकावणे, हिंसा घडवून आणणे आणि बंद पुकारणे आदी कारवायांमागे या फुटीरतावादी नेत्यांचा हात असतो. अशा कारवायांमध्ये अनेक तरुण जीव गमावतात, मात्र या नेत्यांची मुले परदेशात व्यवस्थित सेटल झालेली आहेत. यात आसिया अंद्राबीपासून मीरवाइज उमर फारूक आदी जवळपास सगळ्याच नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे.

Protected Content