Home आरोग्य खामगाव प्रेस क्लबतर्फे उद्या आरोग्य तपासणी शिबिर

खामगाव प्रेस क्लबतर्फे उद्या आरोग्य तपासणी शिबिर

0
49


खामगाव प्रतिनिधी । पत्रकार दिनानिमित्त खामगाव प्रेस क्लबच्या वतीने (दि. ५) पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नांदुरा रोडवरील अग्रवाल हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये हाडांची तपासणी; मान, कंबर व गुड़घ्याची तपासणी;  तसेच कान व वाचादोष समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शहरातील अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल व श्रवण व वाचा विशेषज्ञ डॉ. मंगेश धंदरे हे तपासणी करणार आहेत. या शिबिरात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब खामगाव च्या वतीने करण्यात आले आहे

 


Protected Content

Play sound