यावल पं.स. सहाय्यक गटविकास अधिकारी तडवी यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात

यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय तडवी यांचा सपत्नीक सेवापुर्ती निरोपाचा सोहळा भावनिक व अत्यंत साधा पद्धतीचा कौटुंबीक कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉ. निलेश एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन नि:स्वार्थ, निष्काम सेवेने कार्य करणारे व माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वप्रिय यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान तडवी असे गौरवद्धगार आज त्यांच्या सेवा निवृत्तीपर कौटुंबीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले कार्यक्रमास ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव के.टी. तळेले , कृषी अधिकारी डी .पी कोते , प्रशासन अधिकारी आर .व्ही . जोशी , राष्ट्रपती पुरस्कार विजेते ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांच्यासह ग्रामसेवक मंडळी याप्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान यावल येथे पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय तडवी हे मुळचे हरिपुरा तालुका यावल येथील रहीवासी असुन जळगाव येथे १९८२ साली त्यांनी पशुसंवर्धन विभागात कर्मचारी म्हणुन आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली, आदीवासी कुटुंबात जन्मास आलेले व अत्यंत गरिबीच्या प्रसंगातुन त्यांच्या आई वडीलांनी कुटुंबाने मेहनतीने कष्ठ करून आमचे शिक्षण पुर्ण करून आम्हास आत्मनिर्भर केले, आई वडीलांचे आर्शिवाद आणी आज सेवानिवृती होत असलेले आमचे जेष्ठबंधु लुकमान तडवी यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही आज ईथ पहोचल्याचे मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या कुटुंबातील कनिष्ठ बंधु जे.आय. तडवी सर यांनी आपल्या बालपणी जीवनाच्या आठवणींना उजाळ दिला.

तसेच या निरोप समारंभा प्रसंगी सर्व उपस्थितांचे डोळे अश्रुंनी पाणावले आणी निरोप सोहळा अत्यंत भानिक झाला . याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी आर .व्ही .जोशी ग्रामविकास अधिकारी के जी पाटील आदीनी आपले मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त तडवी यांच्या कार्याचे गौरव या निरोपा सोहळ्यात व्यक्त केलीत. सर्व उपस्थितांचे आभार एन.पी. वैराळकर यांनी मानले.

 

Protected Content