Home Cities जळगाव ऑक्टोबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

ऑक्टोबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

0
109

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत संपूर्ण देशभरात ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार (५ ऑक्टोबर) रोजी नियोजित असलेल जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


Protected Content

Play sound