यावल नगर परिषदच्या निकृष्ट विकास कामांची चौकशी करावी

यावल प्रतिनिधी- नगर परिषदच्या माध्यमातुन विविध विकासकामे करण्याचा सपाटा नगर परिषदच्या माध्यमातुन वेगाने सुरू असुन, मात्र ही कामे वारंवार निकृष्ट प्रतिचे होत असतांना ठेके हे एकाच ठेकेदाराला दिली जात असल्याने शहरवासीयांकडुन संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरातील आणी शहराच्या नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारित वसाहतीमध्ये मागील चार वर्षापासुन शहरातील रस्ते , गटारी , काँक्रीट रस्ते , डांबरीकरण रस्ते ,खुल्या भुखंड च्या संरक्षण भिंतीचे लाखो रुपये निधी खर्च करून काम सद्य परिस्थितीला प्रगतीपथावर सुरू आहे.

 सदरच्या या कामांची गुंणवता आणी  वापरण्यात येणारी वाळु व साहीत्य कोणत्या पद्धतीने वापरण्यात येत आहे हे पाहण्याची साधी वेळ देखील नगर परिषदचे बांधकाम अधिकारी यांच्याकडे नसल्याने शहरात निकृष्ट कामांची जणु मालीकाच गेल्या चार वर्षापासुन सुरू आहे. यात महत्त्वाचे म्हणजे नगर परिषदच्या वतीने शहरातील अत्यंत निकृष्ट कामे करणाऱ्या एकाच ठेकेदाराला स्वार्थ व टक्केवारीच्या आर्थीक मोहाला बळी पडुन दिली जाणारी विकास कामांची गुणंवत्ता निविदांच्या नियम आणी निष्कर्ष पुर्णपणे धाब्यावर ठेवुन होत असलेल्या निकृष्ट कामांमुळे शासनाकडुन शहराच्या सर्वांगीण विकाससाठी येणाऱ्या कोटयावधी रुपयांचा खऱ्या अर्थाने विनियोग करण्यात येत आहे का ? काळया यादीत नांव येण्याच्या मार्गावर असलेल्या त्या एकाच ठेकेदारालाच कामे देण्याचा मागचा हेतु काय , विकास कामांची निविदा प्रक्रीयेत एका पेक्षा अधिक ठेकदारांची निविदा येतात मात्र नगर परिषद प्रशासन एकाच ठेकदारास पाठीशी घालुन विकासकामे  देण्यासाठी फेरनिविदा काढली जाते अशी तक्रार काही ठेकेराकडुन  करण्यात आलेली आहे.

या सर्व आर्थिक गोंधळातुन निर्माण झालेल्या पारिस्थितीतुन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या आर्थिक गोंधळातुन  निर्माण झालेल्या कारभाराची चौकशी करावी व विकास कामांच्या नांवाखाली शासकीय निधीचा होणारा दुरूपयोग त्वरित थांबवावा अशी अपेक्षा यावलच्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Protected Content