यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त यावल काँग्रेस कमिटीच्या वातीने शेतकी संघाच्या सभागृहात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल तालुका सहकारी शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड यांच्याहस्ते प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित यावल तालुका शेतकी संघाचे व्यवस्थापक सुर्यकांत गजरे, काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष कदीर खान, कॉंग्रेसच्या अनुसुचित जाती यावल तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे, विक्की गाजरे, विनोद सोनवणे, रामचंद्र भोईंटे, सुरेश यावलकर, अशोक गाजरे, नागोराव गाजरे यांच्यासह आदी उपस्थित होते.