भाजयुमो तर्फे आयोजित नवमतदाता संम्मेलनात पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी साधला संवाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील फैजपुर येथे भाजयुमोतर्फे आयोजित नवमतदाता संम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्याजी यांनी नवमतदार युवक युवतींशी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधून बहुमोल्य मार्गदर्शन केले.
या संमेलनाला रावेर यावल मतदार संघातील बहुसंख्य युवक युवतींची उपस्थिती राहिली, तसेच या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन, हर्षल पाटील, श्रीकांत महाजन, नारायण चौधरी, पांडुरंग सराफ, नितीन चौधरी, दिलीप पाटील, लोकसभा विस्तारक विलास चौधरी, रावेर विधानसभा विस्तारक सागर नेवे, भाजयुमोचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, रावेर तालुका अध्यक्ष भाजयुमो चेतन पाटील, जयश्री चौधरी, महेश चौधरी, प्रवीण वारले, यशवंत तळेले, मनोज धनगर, योगेश खेवलकर, व्यंकटेश बारी, आकाश पाटील, किरण साबळे, श्याम भंगाळे, अक्षय पाटील, बापु कोळी, सुजित वानखेडे, मयुर पाटील, दुर्गेश पाटील, उमाकांत महाजन, विश्वजित सावळे, संदीप सावळे, पिंटु तेली यांच्यासह भाजपा व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकार्ते उपस्थित होते. आभार आणि सुत्रसंचलन योगेश खेवलकर यांनी केले.

Protected Content