अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी जानेवारीत जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण, एक गुरु, एक दिवस, एक वेळ, एक साधना ह्या तत्वावर भक्त पारायण करतात.
यात सकाळी संत गजानन महाराज मंदिरात गजानन विजय ग्रंथाचे वाचन ज्योतीताई पवार व गजानन भक्त महीला यांनी केले. यावेळी गजानन महाराज परिवारातील महिला मोठ्या संख्येने पारायणासाठी उपस्थित होत्या. संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथांचे 21 अध्यायाचे ते वाचन करण्यासाठी मंत्रमुग्ध होऊन शांततेत वाचण्यासाठी बसलेले होते. नंतर गजानन विजय ग्रंथाच्या 21 अध्यायाचे वाचन झाल्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला.
यावेळी वारीप्रमुख ज्योतीताई पवार, कल्याणी भावे, सरला पाटील, हिराबाई पाटील, इंदीरा येवले, कल्पना पाटील, रेवा पाटील, बबीता पवार, किर्ती शेलकर, वैशाली गोसावी, ज्योती महाजन, शर्मीला पाटील, प्रतिभा नेरकर, सुनिता पाटील, संगिता पाटील, मेघा शिंदे, नितल पाटील, विदया पाटील, चिऊ पाटील सह गजानन भक्त महिला व स्वप्नील पाटील, गजेंद्र पाटील, अशोक भावे, नितीन भावे, रघुनाथ पाटील, डॉ जिजाबराव पाटीलसह उपस्थित होते