श्री राम प्रतिष्ठानतर्फे रणरागिणी झाशीची राणी यांना अनोख्या पद्धतीने वंदना

 

पारोळा प्रतिनिधी । झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त शहरातील श्री राम प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठी शाळा नं. १ येथील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा व परिसराची स्वच्छता करून साजरी केली.

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या ऐतिहासिक वारसा असलेले पारोळा शहरात राणी लक्ष्मीबाई यांचा मराठी शाळा नं १ प्रांगणात अर्धाकृती पुतळा आहे. परंतु, आजूबाजूला झालेलं अतिक्रमण आणि प्रशासनाचे उदासीनता याच्या कचाट्यात सापडलेला पुतळा हा अनेक वर्षांपासून दुर्लक्षितच राहिला आहे. आज राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील श्री राम प्रतिष्ठान च्या तरुणांनी पुतळा आणि परिसरातील स्वच्छता करून आदर्श पद्धतीने जयंती साजरी केली आहे.  सतत मोबाईल आणि राजकारणात वेळ दवडणाऱ्या आजच्या तरुण पिढीसमोर श्री राम प्रतिष्ठानच्या तरुणांनी आदर्श निर्माण केला आहे. शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत असून यापुढे ही असे अनेक समाज उपयोगी कार्य करण्याच्या योजना प्रतिष्ठानतर्फे राबवण्याचा संकल्प केल्याचं या तरुणांनी सांगितलं. या आदर्श उपक्रमासाठी निलेश कुंभार, सुहास राजपुत, गणेश क्षत्रिय, आकाश शिंपी, नरेंद्र शिंपी, संकेत पाखले, हर्षल वाणी, विशाल मेंटकर, सानू कुंभार, विजय चौधरी व श्री राम प्रतिष्ठान गृप सदस्य उपस्थित होते.

Protected Content