जिल्हा महिला असोसिएशनतर्फे विविध कला स्पर्धांना महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

WhatsApp Image 2019 03 09 at 3.47.31 PM 1

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला सप्ताह साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने कांताई सभागृहात विविध कला स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेचे परीक्षक महिमा चौधरी, अलका चौहान, अरुण पाटील, संगीता पवार, प्रतिभा देशकर, ज्योस्तना बडगुजर, अपूर्वा बारस्कर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा भुसावळ येथील प्रा. सीमा भारंबे ह्या होत्या.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
छाया गडे, मीनाक्षी वाणी, शालिनी पाटील, पूजा पाटील, सोनिया म्हस्के, मंगला नगरकर, चंद्रकाला परदेशी, भारती पाथरकर, पुष्पा साळवे, कमल पाटील, वासंती दिघे, शिरीन अमरेलीवाला, सुधाकर पाटील, कांताई सभागृहाचे शाळीग्राम राणे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बालदी, सूत्रसंचालन वैशाली पाटील तर आभार प्रदर्शन बिंदिया नांदेडकर यांनी मानले.

या स्पर्धांचे होत आयोजन
* बहिणाबाई गीत गायन स्पर्धा
प्रथम क्रमांक – जैन महिला मंडळ, द्वितीय – गोदावरी संगीत विद्यालय (ग्रुप पहिला), तृतीय – गोदावरी संगीत विद्यालय (ग्रुप दुसरा ) आणि उत्तेजनार्थ – तेजोमय संगीत विद्यालय

* वाद्यसंगीत स्पर्धा
प्रथम क्रमांक – स्वरा पाठक, द्वितीय – मंजिरी सुगंधिवाले, तृतीय – मीना बियाणी आणि उत्तेजनार्थ – स्वाती वाणी

* शास्त्रीय नृत्य (सांघिक)
प्रथम क्रमांक – कला दर्पण कथक नृत्य, द्वितीय – विजयश्री कथक

* शास्त्रीय नृत्य (एकल)
प्रथम क्रमांक – अपूर्वा थत्ते, द्वितीय – दिशा ढगे, तृतीय – भावना पाटील, उत्तेजनार्थ – दर्शना वर्मा, आकांक्षा शर्मा, दिव्या पाटील

* लघु नाटिका
प्रथम क्रमांक – परिवर्तन ग्रुप, द्वितीय – आदर्श माहेश्वरी मंडळ, उत्तेजनार्थ – अरिहांत मार्गी महिला मंडळ

* पुरुषांची रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक – निलेश गांगुर्डे

* भव्य संगीत खुर्ची स्पर्धा
प्रथम क्रमांक – पूनम सपकाळे, द्वितीय – चंदा व्यास

Add Comment

Protected Content