राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग विमान कोसळले;पायलट सुरक्षित

1538313576 mig 21 pti

बीकानेर (वृत्तसंस्था) राजस्थानातील बीकानेरमध्ये नियमित गस्त घालत असताना हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानाचा वैमानिक सुखरुप असल्याचे वृत्त आहे. हवाई दलाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

बिकानेरजवळ भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. यावेळी विमानातून पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडला. दरम्यान, घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे अधिकारी दाखल झाले असून विमान कोणत्या कारण्यामुळे कोसळले याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मिग -२१ ब्रायसनने नल विमानतळावरून उड्डाण केले होते. अलिकडच्या काळात मिग विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

Add Comment

Protected Content