कामावरून काढलेल्या कामगारांनी लंपास केली ३४ हजारांची रोकड

जळगाव ( प्रतिनिधी ) शहरातील नवीपेठ भागातील एका घरातून पूर्वी तेथेच काम करणाऱ्या दोन कामगारांनी दोन सिलेंडर, मोबाइल फोन, चिल्लर व नोटा असा एकूण ३४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सी सी टी व्ही मध्ये आरोपी सामान घेऊन जाताना दिसत आहेत.

अधिक माहिती अशी की, येथील स्टेडियमजवळील रहिवाशी राकेश काशीनाथ माळी यांच्या बाबा व लखन चायनीज गाड्या लागतात. याचबरोबर जुन्या बसस्थानक येथे त्यांचे हॉटेलही आहे. याठिकाणी कामावर माणसे आहेत. चायनीज गाड्यावर लागणारा सामान ठेवण्यासाठी नवीपेठेत त्यांनी भाडयाने घर घेतले आहे, याठिकाणी कामगार राहतात. नेहमीप्रमाणे दि. ६ रोजी दुपारी कामगार गेला असता त्याला घराचे कुलूप तोडलेले दिसले, याची माहिती राकेश माळी यांना दिली. घरातून दोन सिलिंडर चार हजार रुपये, मोबाईल १५ हजार, ७ हजार रुपयांची चिल्लर, ८ हजारांच्या नोटा असा एकूण ३४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. राकेश माळी याच्या घरात चोरी करणारे अमर शांताराम बारोट व मुकेश रमेश राजपूत हे दोन्ही आरोपी हे त्याच्या चायनीज गाडीवर कामाला होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने कामावरून कमी केले होते. त्यांनीच चोरी केल्याचे सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहे. पुढील तपास हे. कॉ. सुनील पाटील करीत आहेत.

Add Comment

Protected Content