पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला सिल

पाचोरा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जळगाव पिपल्स बँकेची पाच कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आज दुपारी २.०० वाजेच्या सुमारास जळगाव पीपल्स बँकच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या कार्यालयाला सिल ठोकले आहे. यामुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर दि जळगाव पिपल बँकने केलेल्या कारवाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी व हमाल यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. या कारवाईच्या भूमिकेकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे व उपसभापती विश्वासराव भोसले हे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामध्ये हमाल मापाडी महिला कामगार मजूर असे 200 कर्मचारी आहेत व पंचवीस दुकाने असे कृषी उत्पन्न बाजारात व्यवसाय करीत आहेत. या सगळ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लवकरच गंभीर होणार आहे.

Add Comment

Protected Content